मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज मंत्रिमंडळाची बैठक

Uddhav Thackeray

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे आज मंगळवार 22 सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. मंत्रालयातील मंत्रिमंडळ बैठक (cabinet meeting) सभागृहात ही बैठक होईल.

राज्यात सध्या कोरोना ची स्थिती, मनसेची लोकल सुरू करण्याची मागणी, तसेच, राज ठाकरेंसह सुप्रिया सुळे (Supriya Sule), रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केलेली रेस्टॉरंट, जीम सुरू करण्याची मागणी याबाबत आजच्या बैठकीत काही निर्णय होणार का याकडे पाहावे लागेल. तसेच, या काही दिवसात कोरोनाने राज्यात प्रसारणाचा प्रचंड वेग घेतला आहे. राज्यात सध्या अनेक जिल्ह्यांमद्ये कोरोनाची स्थिती गंभीर असून अनेक जिल्ह्यात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात येत आहेे.

कोरोनाबाबत सरकारचे पुढचे पाऊल कोणते असेल हेदेखील बैठकीनंतर कळू शकेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER