कोरोनाची दुसरी लाट रोखण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कामगिरी सर्वोत्तम ; योगी, केजरीवाल पिछाडीवर

Maharashtra Today

मुंबई : जगभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने(Corona Second Wave) थैमान घातले आहे. महाराष्ट्रातही सुरुवातीला रुग्णांची संख्या वाढली होती. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्या सरकारने प्रभावी उपाययोजना करून कोरोनाची दुसरी लाट रोखली. देशातील इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत उद्धव ठाकरे यांची कामगिरी सर्वोत्तम(best performance) आहे. एका सर्वेक्षणातून यासंदर्भात माहिती समोर आली आहे . सर्वेक्षणात कोरोनाची दुसरी लाट रोखण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पहिल्या पसंतीची 62.5 टक्के मते मिळाली आहेत. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ( Yogi Adityanath), दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(Arvind Kejarial) पिछाडीवर आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या नंतर दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असून, त्यांना 31.6 टक्के मते मिळाली. तिसऱया स्थानी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 4.6 टक्के लोकांनी पसंती दिली. तर चौथ्या क्रमांकाची 1.3 टक्के मते केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांना मिळाली आहेत.

दररम्यान ज्येष्ठ पत्रकार, ‘आजतक’ या वृत्तवाहिनीवरील ‘सीधी बात’ या टॉकशोचे प्रसिद्ध ऍन्कर प्रभू चावला(Prabhu Chawla) यांनी ट्विटवर एक पोल घेतला होता. त्यात त्यांनी कोरोनाच्या दुसऱया लाटेत कोणत्या मुख्यमंत्र्यांचे काम प्रभावी आहे? असा प्रश्न विचारला होता . या पोलला देशभरातून प्रतिसाद मिळाला असून प्रथम क्रमांकाची मते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मिळाली आहेत.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button