
मुंबई : भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील लहान मुलांच्या अतिदक्षता वार्डला मध्यरात्री अचानक आग लागली. या आगीत 17 नवजात बाळांपैकी 10 बालकांचा मृत्यू झाला. या मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच याप्रकरणी चौकशीही करण्यात येणार आहे. दरम्यान या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी 12 वाजता भंडारा जिल्ह्यातील दूर्घटनाग्रस्त हॉस्पिटलची (Bhandara Hospital Fire)पहाणी करणार. तसेच नवजात बालकं गमावलेल्या पालकांचे सांत्वन करून त्यांना दिलासा देणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज सकाळी 7.30 वाजता वर्षा बंगल्यावरुन भंडाराकडे रवाना होतील. दुपारी 12 वाजता ते भंडारा जिल्ह्यातील दुर्घटनाग्रस्त हॉस्पिटलची पहाणी करणार आहेत. यानंतर ते नवजात बालकं गमावलेल्या पालकांचे सांत्वन करुन त्यांना दिलासा देतील.
नेमकं प्रकरणं काय?
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विशेष नवजात अतिदक्षता कक्षात लागलेल्या आगीत दहा नवजात निष्पाप बालकांचा जळाल्याने आणि श्वास गुदमरून मृत्यू झाला. सात बालकांना वाचविण्यात यश आले. शनिवारी पहाटे २ वाजता अग्नितांडवात चिमुकल्यांचा बळी गेल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. जिल्हा रुग्णालयात चिमुकल्यांच्या मातांचा आक्रोश आसमंत भेदून टाकत होता. ही आग शार्टसर्किट की इनक्युबेटर जळाल्याने लागली, याचा तपास केला जात आहे. मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मृतांच्या प्रत्येक कुटुंबाला पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.
ही बातमी पण वाचा : भंडारा दुर्घटना : सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- वंचित बहुजन आघाडी
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला