मंदिरे उघडण्याबाबत आज मुख्यमंत्री घोषणा करण्याची शक्यता

CM Uddhav Thackeray

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी १.३० वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. दिवाळी, बिहार निवडणुकीचे (Bihar election) अंदाज आणि अमेरिकेच्या निवडणुकीचा निकाल या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी काय संवाद साधणार (CM Uddhav Thackeray will address Maharashtra Today) याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, दिवाळीनंतर राज्यातील मंदिरे उघडण्याबाबत (About opening temples) ते घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील कोरोना, दिवाळी, मराठा आरक्षण यांसह विविध विषयांवर मुख्यमंत्री जनतेला सूचना देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यातील जनतेला संबोधित केल्यानंतर उद्धव ठाकरे विविध कामांचे ऑनलाईन लोकार्पण करणार आहेत. महाराष्ट्रात लॉकडाऊन झाल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेळोवळी राज्यातील जनतेशी संवाद साधत होते. या माध्यमातून ते नागरिकांना सातत्याने राज्यातील कोरोनाची परिस्थिती, सरकारकडून करण्यात आलेल्या उपाययोजना आणि इतर गोष्टींची माहिती देत होते. अनेक लोकांकडून उद्धव ठाकरे यांच्या या कृतीचे कौतुकही करण्यात आले होते.

लॉकडाऊननंतर मिशन बिगेन अंतर्गत राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यात अनेक गोष्टी या पूर्णपणे सुरू करण्यात आल्या आहेत. तर काही ठिकाणी ५० टक्के क्षमतेवर सुरू आहेत. मात्र अजूनही राज्यातील मंदिर, मुंबईची लाईफलाईन म्हणजेच लोकल हे अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. यावरून सरकारवर सातत्याने टीका होत आहे. त्यामुळे आज जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री काही मोठी घोषणा करतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच बिहार निवडणुकीचे अंदाज आणि अमेरिकेच्या निवडणुकीचा निकाल याविषयी उद्धव ठाकरे बोलणार का, याकडेही सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER