मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे विमानतळावर स्वागत

CM Uddhav Thackeray

कोल्हापूर : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे विमानतळावर आज, शुक्रवारी दुपारी 4 वाजता आगमन झाले. सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले. जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापौर ॲड. सुरमंजिरी लाटकर, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी,पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले.

यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार चंद्रदीप नरके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रवी शिवदास, आदी मान्यवर उपस्थित होते.