केंद्राने ३७० हटवून न्यायप्रियता दाखवली, तीच गती आरक्षणाबाबत दाखवावी; मुख्यमंत्र्यांचे आवाहन

CM Uddhav Thackeray

मुंबई : आरक्षणाचा (Maratha Reservation) निर्णय घेण्याचा अधिकार राज्याला नसून केंद्र आणि राष्ट्रपतींना आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावर तातडीने निर्णय घ्या, अशी मी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना हात जोडून विनंती करतो, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केले आहे. यावरून राजकारण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथिगृहावर तातडीची बैठक झाली. त्यानंतर महाराष्ट्र कोरोनाविरुद्धची शर्थीची लढाई लढताना सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा निर्णय फेटाळला.

राज्याच्या विधिमंडळात सर्वच राजकीय पक्षांनी एकमुखाने घेतलेल्या या निर्णयावर आता सर्वोच्च न्यायालयाने वरवंटा फिरवला. महाराष्ट्र सरकारला या आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नाही. गायकवाड समितीच्या शिफारशींबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयासह न्यायालयाने केराची टोपली दाखवली, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. “महाराष्ट्राची विधानसभा सार्वभौम आहे व सरकार हे लोकांचा आवाज आहे. मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील मोठ्या पीडित वर्गाचा आक्रोश असल्यामुळेच सरकारने निर्णय घेतला. आता मराठा आरक्षणाबाबतचा तातडीचा निर्णय पंतप्रधान व राष्ट्रपतींनीच घ्यावा, ही त्यांना हात जोडून विनंती आहे. त्याआाधी शहाबानो प्रकरण, ॲट्रोसिटी कायद्यासंदर्भात तसेच ३७० कलम काढण्यासंदर्भात, केंद्राने तत्पर निर्णय घेऊन न्यायप्रियता दाखवली आहेच.

आता तीच गती मराठा आरक्षणाबाबत दाखवावी.” असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे. छत्रपती संभाजीराजे हे गेल्या वर्षभरापासून मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधानांची वेळ मागत आहेत, त्यांना पंतप्रधानांनी का वेळ दिली नाही? मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार पंतप्रधानांना आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करता येणार नाही. पण या निमित्ताने कोणी महाराष्ट्राचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू नये. जनतेने उगाच डोकी भडकवून घेऊ नये. मराठा आरक्षणाबाबत कायद्याची लढाई विजय मिळेपर्यंत सुरूच राहील, असे आश्वासनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button