…जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राष्ट्रवादीच्या मंत्र्याला सेल्फी काढायला शिकवतात!

Uddhav Thackeray-Rajendra Shingane

बुलडाणा :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी लोणार सरोवराच्या पाहणीदरम्यान त्यांनी आपल्या मोबाईलमधून सरोवराचे सुंदर फोटो काढले. याच दरम्यान सहकारी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र शिंगणे यांनाही त्यांनी सेल्फी काढायला शिकवले. सरोवराची पाहणी केल्यानंतर तथा अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर औपचारिक फोटो सेशन करतेवेळी मंत्री शिंगणे सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांना ती घेता येत नव्हती.

साधेभोळे मंत्री असलेले शिंगणे यांना सेल्फी घेण्यास अडचण येते हे पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा सेल्फी क्लास घेतला. शिंगणेंच्या हाताला हात लावून, मोबाईल जरासा उंचीवर पकडून त्यांनी एक छानसा सेल्फी घेतला. आज सकाळीच मुख्यमंत्र्यांनी मुंबईवरून बुलडाण्याच्या दिशेने प्रयाण केलं. सकाळी साडेनऊच्या आसपास ते लोणार सरोवरावर पोहचले. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री राजेंद्र शिंगणे तसेच शासकीय अधिकारी उपस्थित होते.

पाहणीदरम्यान सरोवराचं देखणं रूप बघून मुख्यमंत्र्यांना फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. दरम्यान लोणार सरोवर हे जैवविविधतेचे भांडार आहे. या सरोवराचा विकास करताना एक निश्चित नियोजन तयार करावे. त्यानुसार आराखडा तयार करावा आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी केली तरच हे सरोवर पर्यटनासाठी नावारूपास येईल, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. लोणार सरोवर येथील वनकुटी व्ह्यू पॉइंटला त्यांनी भेट दिली.

ही बातमी पण वाचा : लोणार सरोवर विकासाचा निश्चित नियोजन आराखडा तयार करा : मुख्यमंत्री ठाकरे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER