बाळासाहेबांचा संदर्भ देत उद्धव ठाकरेंनी दिल्या आजीच्या आठवणींना उजाळा

Balasaheb Thackeray - Uddhav Thackeray

मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi) एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला . सोबतच या मुलाखतीदरम्यान बाळासाहेबांचा संदर्भ देत उद्धव ठाकरेंनी आजीच्या आठवणींना उजाळा दिला आहे .

मी माझ्या आजीला म्हणजे शिवसेनाप्रमुखांच्या (Shiv Sena) आईला कधी बघितलं नव्हतं. माझे आजोबा सांगायचे किंवा बाळासाहेबही (Balasaheb Thackeray) सांगायचे की त्या आजीला असं वाटायचं की आपल्या मुलाने गव्हर्मेंट सर्व्हंट व्हावं. माझ्या आजीच्या मुलाने सरकार स्थापन केलं आणि तिचा नातू सरकार चालवतोय. हा असा सगळा योगायोग आहे,” असं वक्तव्य उद्धव यांनी आजीच्या इच्छेसंदर्भात माहिती देताना केलं.

राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार येऊन एक वर्ष पूर्ण झालं आहे. मुख्यमंत्री पदाची जबाबदारी आणि हा एका वर्षातील प्रवास यासंदर्भात काय सांगाल अशा आशयाचा प्रश्न राऊत यांनी उद्धव ठाकरेंना विचारला. यावर उत्तर देताना उद्धव यांनी परिस्थितीमुळे आपल्याला ही जबाबदारी स्वीकारावी लागल्याचे म्हटले. “मी प्रामाणिकपणे सांगतो की एक वर्ष पूर्ण झालं. मी शासन प्रशासन या पठडीतला नाही. आमची ही म्हणजेच आदित्यची (Aaditya Thackeray) सहावी पिढी आहे जी महाराष्ट्राची सेवा करत आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER