कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात केली नाही, तो टप्प्याटप्प्यात दिला जाईल – मुख्यमंत्री

CM Uddhav Thackeray

मुंबई : राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा आज संध्याकाळी ३०२वर गेला आहे. तर मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ही १५३ वर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. महाराष्ट्रातील जनतेने एकच मंत्र लक्षात ठेवा. कुठेही गर्दी करु नका. आपण या युद्धात जिंकणार म्हणजे जिंकणारच असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

आपण कोरोनाविरुद्धच्या लढाईत अखेरच्या आणि निर्णायक टप्प्याकडे जात आहोत. मुंबईत काही ठिकाणी सील केलं गेलं आहे. हे करावं लागतं आहे. कारण रु्ग्णांच्या अलीकडचे आणि पलीकडचे संपर्क आपण शोधतोय. त्यांच्यापासून इतरांना कुणाला संसर्ग होऊ नये त्याची काळजी आपण घेत आहोत, त्यामुळे वस्त्या, इमारती सील कराव्या लागत आहेत. कोरोना विषाणू आपली पकड मजबूत करायला बघतो आहे. पण आपणसुद्धा धैर्याने त्याला तोंड देत आहोत. या लढाईत आपला संयम आणि आपली जिद्ध ही आपली तटबंदी आहेत. या तटबंदीवर विषाणूंनी कितीही टकरा मारल्या तरी आपण लेचेपेचे नाही आहोत. कारण आणि संयमाची आणि जिद्दीची तटबंदी मजबूत आहे. टकरा मारुन तो नष्ट होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

सुरुवातीला केंद्र सरकारनं काही देशांचा समावेश कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत केला नव्हता. त्यामुळे अशा देशांमधून आलेल्या व्यक्तींची विमानतळांवर तपासणी होऊ शकली नाही. परदेशातून आलेल्या, मात्र तपासणी न झालेल्या अशा व्यक्तींनी पुढे यावं, स्वत:ची माहिती द्यावी आणि तपासणी करून घ्यावी, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.

नायडू हॉस्पिटलचे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांशी बोललो. त्यांनी घातलेले किट पाहून गणवेशधारी सैनिक बसले आहेत असं वाटत होतं. आरोग्य कर्मचारी, एसटी, बीएसटी गाडी चालक, पोलीस या सर्व कर्मचाऱ्यांची कौतुक करायचे आहे. महाराष्ट्रातल्या या कर्मचाऱ्यांचे कपात केलेलं नाही. हे अचानक उद्भवलेलं संकंट आहे. कोरोनाचं संकट गेल्यानंतर आर्थिक संकंट येण्याची शक्यता आहे. संपूर्ण जगाला त्याला तोंड द्यावं लागणार आहे. आर्थिक घडी मोडू नये याची खबरदारी घेत आहोत. कोणाच्याही वेतनात कपात केलेली नाही. फक्त काही टप्प्यात विभागणी केलेली आहे.

अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे वेत कपात केलेलं नाही. कुणाचंही वेतन कपात केलेली नाही. थोडीशी घडी नीट बसवण्यासाठी आपण मांडणी करत आहोत. कोरोनाचं संकट असतानाही शासकीय कर्मचारी सेवा देत आहेत. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचं काम सुरू आहे. वैद्यकीय कर्मचारी अहोरात्र राबत आहेत. पोलीस आपल्या संरक्षणासाठी कार्यरत आहेत. जनतेच्या सेवेसाठी अखंडपणे कार्यरत असलेल्या मंडळींचा पगार कापण्याचा प्रश्नच येत नाही. सर्वांनी सहकार्य करावं,” असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

मधल्या काळात जे प्रवासी किंवा पर्यटक आले असतील केंद्र सरकारच्या यादीत नावे नसलेल्या देशांमधून आलेल्या प्रवाशींनी पुढे या आणि आपली माहिती द्या आणि तपासणी करुन घ्या. आपल्यापासून इतरांना धोका निर्माण करु नका,असेही आवाहन उद्धव ठाकरेंनी केले.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बऱ्याचदा सर्दी, खोकल्याचा त्रास होतो. त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही. एखाद्या व्यक्तीला अ‍ॅलर्जी असल्यास, त्यांनी विशेष काळजी घ्यावी. उष्णता वाढल्यावर एसी लावू नये. त्याऐवजी खिडक्या उघडाव्यात. कोरोनाचा विषाणू थंड वातावरणात जास्त काळ टिकतो. त्यामुळे कृपया एसी लावू नका. थंड पाणी, पेय पिऊ नका, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कोरोनाच्या भीतीनं अनेक खासगी डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने बंद ठेवले आहे. मात्र त्यांची सध्याच्या घडीला नितांत गरज आहे. शासकीय वैद्यकीय कर्मचारी जीवावर उदार होऊन काम करत आहेत. त्यामुळे खासगी डॉक्टरांनी दवाखाने सुरू करावेत आणि त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळून आल्यास त्यांना शासकीय रुग्णालयांमध्ये पाठवावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांची पुन्हा एकदा केलं.

टीव्हीवर ज्या बातम्या येत आहेत. अनेक मजूर स्थलांतर करत आहेत. मात्र, स्थलांतर करु नका. आता त्यांना जात येणार नाही. जिल्हा आणि राज्याच्या सीमा बंद केल्या आहेत. सर्व मजुरांच्या काळजी साठी १००० ठिकाणी जेवणाची केंद्र सुरु केली आहे. जवळपास लाखापेक्षाही जास्त मजूर आहेत. प्रत्येक राज्यात मजुरांची काळजी घेतली जात आहे. रेशनबद्दल केंद्र सरकारकडून सूचना आले आहेत. राज्य सरकारकडूनही वाटप होणार नाही. जीवनाश्यक वस्तूंचा तुटवडा होऊ देणार नाही. तेवढा साठा आहे.

“शिवभोजन थाळी आता पाच रुपयात केली आहे. शिवभोजन थाळ्यांची संख्या २५ हजारांपर्यंत गेली आहे. मी १ लाखांपर्यंत परवानगी दिली आहे. त्याही पलीकडे जायचं झालं तर तेही करु. पण अनावश्यक गर्दी करु नये. शिवभोजन केंद्रातही अनावश्यक गर्दी करु नये. हळूहळू शिस्त येत आहे. मात्र, ती शिस्त पूर्णपणे आली पाहिजे. भाजी मार्केटमध्ये अंतर ठेऊन उभं राहावं. सगळं व्यवस्थित होत आहे,” असेही मुख्यमंत्री म्हणाले. बरे होऊन घरी जाणारेसुद्धा आहेत. लक्षणे लपवू नका. या युद्धात आपण जिंकणारच, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.