महाराष्ट्रात एनआरसी लागू देणार नाही: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

CM uddhav Thackeray

सिंधुदुर्ग: महाराष्ट्रात एनआरसी लागू देणार नाही, असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर असताना , सिंधुदुर्ग येथे आज त्यांची पत्रपरिषद झाली. यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले.

नागरिकत्व सुधारणा कायदा ‘सीएए’ आणि एनआरसी हे दोन स्वतंत्र मुद्दे असून, एनपीआर हा वेगळा विषय आहे. सीएए लागू झाल्यानंतर घाबरण्याचे कारण नाही, असे ते यावेळी म्हणाले.

एनपीआर केवळ जनगणना असून, आपण स्वत: एनपीआरविषयक अर्जाची तपासणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री कार्यालयामार्फत याबाबत मराठीत ट्विटही केले आहे. एनआरसी लागू केल्यास, केवळ हिंदू-मुस्लिमच नव्हे, तर इतर वंचितांनाही ते त्रासदायक होईल, असे या ट्विटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.