अहो अजितदादा आपण एवढी वर्षे मधली आपण उगाच घालवली : उद्धव ठाकरे

CM Uddhav Thackeray - Ajit Pawar

मुंबई : मी आणि अजितदादा कार्यक्रम पाहात होतो. तेव्हा एक कार्यकर्ता मला वळूनवळून सांगत होता दादांना सांभाळा. त्यावर मी आता उत्तर देतो. अहो अजितदादा आपण एवढी वर्षे मधली आपण उगाच घालवली. उगाचच इतकी वर्षे वेगळं राहिलो. आधीच एकत्र यायला हवं होतं. आता जे एकत्र आलो आहोत ते चांगल्या आणि विधायक कामांसाठी एकत्र आलो आहोत, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले .

मुख्यमंत्री ‘उद्धव ठाकरे’ यांच्यात निर्णय घेण्याची ‘धमक’ नाही : निलेश राणे

आता जे चांगलं आहे ते करुन दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही अशी शपथ छत्रपती शिवाजी महाराज आणि आई जिजाऊंच्या साक्षीने घेतो असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडीचं सरकार हे माझं सरकार आहे ही भावना आज प्रत्येक गोर-गरीबांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळेच आज शिवजन्माच्या सोहळ्याचा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे त्याला गर्दी झाली आहे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. शिवनेरी आणखी कशी सजावयची याकडे आम्ही लक्ष देतो आहोत. हे आपलं वैभव आहे”असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान उद्धव ठाकरे हे भाषण करत होते त्याचवेळी जमलेल्या गर्दीपैकी एकजण ओरडून म्हणाला ते शिवस्मारकाचं लवकर बघा. त्यावरही उद्धव ठाकरेंनी हसून दाद दिली आणि म्हणाले “होय सगळं बघतो. आज लोकांचं सरकार आलेलं आहे. त्यामुळे काळजी करु नका, असे उद्धव ठाकरे म्हणाले .