आमच्या धमण्यांमध्ये-रक्तामध्ये शिवराय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

cm-uddhav-thackeray-pays-tribute-to-chhatrapati-shivaji-maharaj-in-shivneri-

शिवनेरी :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज शिवनेरीवर (Shivneri) येऊन शिवाजी महाराजांना अभिवादन केले . यावेळी आमच्या धमण्यांमध्ये, रक्तांमध्ये शिवाजी महाराज आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला .

शिवनेरीवर शिवाजी महाजांना मानाचा मुजरा केल्यानंतर झालेल्या छोटेखानी भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केले .

छत्रपतींनी ज्या काही लढाया केल्या त्यात त्यांनी शत्रूला पराभूत केले. त्यांच्या ढाल तलवारी आज नसल्या तरी कोरोना या शत्रूशी लढाई करताना मास्क ही आपली ढाल आहे, हे विसरू नका. छत्रपती दैवत का आहे. तर लढण्यासाठी तलवार पकडण्याची जिगर त्यांच्यात होती.कोरोनाशी लढतांना ही प्रेरणा व जिद्द आम्हाला मिळते आहे. पण आता कोरोनासारखा दुश्मन आहे. त्यावर आपल्याला मात करायची आहे, असं सांगतानाच साप तसे अजूनही आहे. काही साप चावतात. तर काही चावत नाहीत. त्यांना ठेचायचे असते , अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर नाव न घेता टीका केली.

शिवनेरीवर शिवाजी महाजांना मानाचा मुजरा केल्यानंतर झालेल्या छोटेखानी भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं. शिवरायांपुढे नतमस्तक व्हायला शिवजंयतीच पाहिजे असं नाही. कोणतंही पवित्र काम करताना शिवाजी महाराज आठवतात. कारण शिवाजी महाराज आपल्या धमण्यात आणि रक्तात आहेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. दुसरे वर्ष आहे शिवनेरीवर येण्याचे. हा बहुमान शिवरायांच्या आशीर्वाद आणि आपल्या सर्वांच्या प्रेमाने लाभला आहे. मनात, हृदयात अखंड शिवरायांचे स्थान आहे. त्यांना वंदन करण्यासाठी शिवजयंतीची गरज नाही. प्रत्येक चांगल्या कामात शिवरायांचे स्मरण नकळत होत राहते. सध्या वातावरण चांगले आहे पण तोंडावर मास्क आहे. कोरोनाशी आपली लढाई सुरू आहे, असं त्यांनी सांगितले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER