मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली

CM Uddhav Thackeray-Indira Gandhi

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र आदरांजली वाहिली आहे.

मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र आदरांजली वाहिली.

मुख्यमंत्री अभिवादन संदेशात म्हणतात, कणखर आणि विकासाची दृष्टी असणारे नेतृत्व म्हणून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जगभरात ओळख होती. स्वर्गीय इंदिराजींचे भारताच्या विकासात अमूल्य असे योगदान आहे. आधुनिक भारताच्या उभारणीसाठी तसेच देशाला एकात्म, अखंड ठेवण्यासाठी त्यांनी कणखरपणे निर्णय घेतले. त्यासाठी त्यांना बलिदानही द्यावे लागले. त्यांच्या बलिदानातून आपल्याला देश महासत्ता बनविण्याची प्रेरणा घ्यावी लागेल. त्यासाठी आजच्या राष्ट्रीय संकल्प दिवसाचेही आपण गांभीर्यपूर्वक स्मरण करूया, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

Source:- Mahasamvad News

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER