किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून यंत्रणेला सूचना

Maharashtra Today

मुंबई :- भारतीय हवामान खात्यानुसार लक्षद्वीपजवळ अरबी समुद्रात (Arabian Sea)अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, शनिवारी त्याचे ‘तोत्के’(Totke) चक्रीवादळात रूपांतर होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हे चक्रीवादळ अतितीव्र स्वरूपात 17 मेच्या मध्यरात्री गुजरात किनारपट्टीजवळ पोहोचण्याची शक्यता आहे. परंतू काही समुद्री हालचाली झाल्या तर हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर देखील धडकू शकते. त्याच संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली आहे.

अरबी समुद्रातील तोत्के चक्रीवादळाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी किनारपट्टीवरील भागात पूर्णपणे सतर्कता ठेवावी, अशा सुचना केल्या आहेत. विविध यंत्रणांनी सावध राहून आवश्यक ते बचाव कार्य करावं, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

विशेषतः पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणार असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी सज्ज रहावे व मनुष्यबळ तसेच साधन सामुग्री तयार ठेवावी असे , उद्धव ठाकरे यांनी यंत्रणांना सांगितले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button