निवडणुकीच्या कामाला लागा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मंत्र्यांना आदेश

Uddhav Thackeray

मुंबई :- नुकत्याच संपन्न झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला अपेक्षित मोठे यश मिळाले. या पार्श्वभूमीवर बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना मंत्र्यांची बैठक पार पडली. त्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी घेतल्याची माहिती अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी तसेच आगामी निवडणुका आणि रखडलेल्या कामांसंदर्भात बैठक घेतली. या बैठकीला उद्योग मंत्री सुभाष देसाई, कृषी मंत्री दादा भुसे, आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर, शंकरराव गडाख, संजय राठोड हे मंत्री हजर होते. तर इतर मंत्री बैठकीला ऑनलाइन उपस्थित होते. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सोबत एकत्र लढण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतल्याची माहिती सत्तार यांनी दिली. या बैठकीत शिवसेना मंत्र्यांचे प्रश्न होते ते मांडण्यात आले. त्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला. तसेच निवडणुकीच्या कामाला लागा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती संजय राठोड (Sanjay Rathore) यांनी दिली.

ही बातमी पण वाचा : कोरोनाचा ओघ कमी होताच मुख्यमंत्री ठाकरे ऑन फिल्ड ; दौऱ्यांचा सपाटा सुरू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER