कोविडचा रुग्ण वेळेत ओळखला गेला पाहिजे, त्याचं कुटुंब वाचवलं पाहिजे : उद्धव ठाकरेंचे आवाहन

CM Uddhav Thackeray-on third-wave-corona

मुंबई :- राज्यात कोरोनाच्या (Corona Virus) संभाव्य तिसऱ्या लाटेची भीती आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ऑनलाईन कार्यशाळेचे उद्घाटनप्रसंगी संवाद साधला.

कोविडचा रुग्ण वेळेत ओळखला गेला पाहिजे. त्याच्यापासून त्याचं कुटुंब वाचवलं पाहिजे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

माझं मत आहे की कोविडचा रुग्ण वेळेत ओळखला गेला पाहिजे. त्याच्यापासून त्याचं कुटुंब वाचवलं पाहिजे, त्याला तर वाचवलंच पाहिजे; पण संसर्ग हा त्याच्या कुटुंबीयांना होता कामा नये. कारण, आता जी तिसऱ्या लाटेची शक्यता आहे, ती लहान मुलांमध्ये येईल का? येईल ना येईल हा अंदाज आहे. पण लहान मुलांमध्ये कोणाच्या मार्फत येईल? जसं पहिल्या लाटेत आपण सांगत होतो की मी सुरक्षित तर माझं कुटुंब सुरक्षित.

साहजिकच आहे पहिल्या लाटेच्या वेळी कोरोनाबाधितांपासून ज्येष्ठ नागरिकांना याचा धोका अधिक होता. तसं जर आता वयाचं अनुमान लावलं तर कोरोनाबाधित कुटुंबातील एक जण असेल, तर त्याच्यापासून मुलांना कोरोना संसर्ग होण्याची जास्त शक्यता आहे. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला कोरोना होऊ न देणं. आपण कोरोनापासून दोन हात लांब राहणं. हे सगळ्यांनी अंगीकारलं पाहिजे.

पावसाळा सुरू झाल्यानंतर इतर जे आजार उद्भवणार याबाबतदेखील उपचार करताना, काय सावधानता बाळगायला हवी, हे लक्षात घेऊन तुम्हाला ती उपचार पद्धती अवलंबावी लागणार आहे, असेही ठाकरे म्हणाले.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button