अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचं राजकारण करू नये : उद्धव ठाकरे

Sushant Singh Rajput-cm-uddhav-thackeray

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने (Sushant Singh Rajput) आत्महत्या करुन जवळपास दीड महिना उलटला आहे. पण त्याच्या आत्महत्येचे नेमकं कारण अद्याप समोर आलेले नाही. अनेक कलाकार आणि नेतेमंडळींनी याप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी देखील केली आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणीही या प्रकरणाचं राजकारण करू नये, असे उद्धव ठाकरे म्हणाले. “मुंबई पोलीस हे कार्यक्षम आहेत. जर कोणाकडेही कोणते पुरावे असतील तर त्यांनी ते आमच्याकडे सोपवावे,” असेही त्यांनी नमूद केले .

ही बातमी पण वाचा:- सुशांतसिंह आत्महत्या; ‘संशयास्पद व्यवहारां’बाबत ईडीने दाखल केला गुन्हा 

“जर कोणत्याही व्यक्तीकडे पुरावे असतील तर ते त्यांनी पोलिसांकडे सोपवावे. आम्ही दोषींची चौकशी करून त्यांना शिक्षा करू. परंतु कृपया करून या प्रकरणाचा वापर महाराष्ट्र आणि बिहार या राज्यांदरम्यान वाद उत्पन्न करण्यासासाठी करू नका,” असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER