एप्रिल अखेरपर्यंत रुग्णसंख्या १२ लाखांवर जाणार; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत खुलासा

CM Uddhav Thackeray on corona virus outbreak

मुंबई : राज्यात आलेली कोरोनाची (Corona Virus) दुसरी लाट त्सुनामीसारखी आहे. एप्रिल अखरेपर्यंत राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या १२ लाखांवर जाण्याची भीती व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या बैठकीत ही माहिती उघडकीस झाली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील व्यापारी संघटना आणि त्यांच्या प्रतिनिधींशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला. या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, राज्य टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी आदी उपस्थित होते.

“फेब्रुवारीपासून राज्यात आतापर्यंत ३० पट रुग्णसंख्या वाढ झाली आहे. रुग्णांची संख्या ४ लाखांवर पोहचली होती. मागील वर्षी सप्टेंबर २०२० मध्ये रुग्णसंख्येपेक्षा कित्येक पटींनी रुग्णसंख्या झाली आहे. भारत सरकारच्या अंदाजानुसार एप्रिल अखेरीस १२ लाखांवर रुग्णसंख्या पोहचू शकते.” असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव व्यास यांनी सांगितले. “राज्यात गंभीर परिस्थिती आहे. विषाणूचा नवा स्ट्रेन त्याचा फैलाव वेगाने करत आहे आणि तो डबल म्युटंट आहे. त्यासाठी विषाणूची साखळी तोडणे हाच यावर उपाय आहे. ही दुसरी लाट त्सुनामीसारखे दिसते आहे. कोरोना रोखण्यासाठी लागतील ते प्रयत्न करावे लागतील.” असे टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले.

रस्त्यावर उतरण्याची भाषा करू नका
रस्त्यावर उतरण्याची भाषा करू नका. हा लढा सरकारशी नाही तर विषाणूशी आहे. तुम्ही महाराष्ट्राचे भूमिपुत्र आहात. तुमचे नुकसान होऊ देणार नाही. कोणाच्याही चिथावणीला बळी पडू नका. संकटाच्या काळातच शत्रू आणि मित्र कोण यांची ओळख होते हे समजून घ्या. न डगमगता यातून बाहेर पडायचे आहे. कोरोनावर मात करायची आहे, हे लक्षात घ्या, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यापाऱ्यांना केले.

धारावी पॅटर्नही फोल ठरणार?
“यापूर्वी आपण सामाजिक अंतराचे चौकोन आखले होते. त्यातून परिश्रमाने, मेहनतीने पहिल्या लाटेवर मात केले होते. यात धारावी पॅटर्नचे जगभर कौतुक केले होते. पण आता परिस्थितीच विचित्र झाली आहे. कोरोनाचे हे संकट दुर्दैवी आहे. ही लाट प्रचंड मोठी आहे. कोणत्याही गोष्टी बंद करण्याची भूमिका नाही, हे यापूर्वीच स्पष्ट केले. कोणाच्याही रोजी-रोटीवर निर्बंध आणावेत किंवा लॉकडाऊन करावे, अशी इच्छा नव्हती. या आधीपासून सर्व जनतेला सावध करत होतो. फेब्रुवारी-मार्चमध्ये काही शेकड्यांमध्ये रुग्णसंख्या खाली आणली होती. पण आता रुग्णसंख्या वेगाने वाढते आहे.” असे मुख्यमंत्री म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button