मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; नारायण राणेंची मागणी

Narayane Rane & Uddhav Thakeray

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग(Parambir Singh) यांच्या लेटरबॉम्बप्रकरणात गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अथवा देऊ नये हा राष्ट्रवादीचा प्रश्न आहे. पण या प्रकरणात झालेल्या आरोपाने महाराष्ट्राची बदनामी झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी ज्येष्ठ भाजप नेते नारायण राणे(Narayan Rane) यांनी केली.

नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन आज पुन्हा एकदा ठकारे सरकारवर निशाण साधला.

सचिन वाझे कुठे राहत होते हे मुख्यमंत्र्यांना माहीत आहे. वाझे वर्षा निवासस्थानी आणि ओबेरॉय हॉटेलमध्ये राहत होते. वर्षावर राहून वाझे सर्व माहिती मुख्यमंत्र्यांना देत होते, असा गौप्यस्फोटही राणे यांनी केला. वाझे काय करत होते. त्यांचे काय उद्योग होते, हे सर्व मुख्यमंत्र्यांना माहीत होतं, असंही त्यांनी सांगितले .

सचिन वाझेंना पोलीस खात्यात आम्ही आणले नाही, असे अनिल देशमुख आणि परमबीर सिंगही म्हणत आहेत. म्हणजेच वाझेंना पोलीस खात्यात मुख्यमंत्र्यांनी आणल्याचे स्पष्ट होत आहे. सिंग यांचा रोख थेट मुख्यमंत्र्यांच्या दिशेने आहे. वाझे हे मुख्यमंत्र्यांसाठीच काम करत होते. तेच त्यांचे वाझेंचे गॉडफादर आहेत. हिरेन यांना मारण्याचे पाप वाझेंनीच केले आहे. वाझे सर्व माहिती मुख्यमंत्र्यांना देत होते. त्यामुळे वाझे हे मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शक होते का? असा सवाल करतानाच या प्रकरणात गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्या अथवा नका घेऊ, फम पण मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी राणे यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER