मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री ऍक्शन मोडवर; घेतली उच्चस्तरीय बैठक

Maratha Arakshan

मुंबई : मराठा आरक्षण टिकून राहावे यासाठी आता खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मैदानात उतरले आहे. त्यांनी आज (16 जुलै) मराठा उपसमितीची महत्त्वाची बैठक घेतली.मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर ही बैठक पार पडली.या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारकडून सुरु असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला.

या आढावा बैठकीत मराठा उपसमितीचे अध्यक्ष आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, (Ashok Chavhan)नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) महाधिवक्ता कुंभकोणी, मराठा उपसमितीचे इतर सदस्य व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी झाले.

मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात वैध ठरावं यासाठी राज्य सरकारकडून ख्यातनाम वकिलांची टीम नियुक्त करण्यात आली आहे. याशिवाय मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मंत्रिमंडाळातील नेत्यांची उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. मंत्री अशोक चव्हाण हे या समितीचे अध्यक्ष आहेत. तर मंत्री एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, (Balasaheb Thorat) दिलीप वळसे पाटील, विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) हे या समितीचे सदस्य आहेत.

मराठा आरक्षणाबाबत २७ जुलैपासून सर्वोच्च न्यायालयात नियमित सुनावणी होणार आहे. काल (१५ जुलै) सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या अंतरिम आदेशावर सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने तूर्तास कोणताही अंतरिम आदेश किंवा वैद्यकीय प्रवेश प्रकियेला स्थगिती दिलेली नाही. ही एक दिलासायक बाब असल्याची प्रतिक्रिया काल अशोक चव्हाण यांनी दिली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER