आता कर्नाटकची मस्ती जिरवण्याची वेळ आली आहे – मुख्यमंत्री

CM Uddhav Thackeray

मुंबई :- डॉ. दीपक पवार यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर (Maharashtra-Karnataka border dispute) पुस्तक लिहिले आहे. हा पुस्तक प्रकाशन सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हेदेखील उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thcakeray) यांनी सीमावादावर भाष्य करताना कर्नाटक व्याप्त भूभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करा, अशी मागणी केली.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, मराठी अस्मिता, मराठी शक्ती जोपर्यंत एकवटत नाही, तोपर्यंत कर्नाटक सीमावादाचा प्रश्न सुटणार नाही. कोर्टात एखादं प्रकरण असेल तर त्यानुषंगाने कोणतेही निर्णय घ्यायचे नसतात. कारण तो कोर्टाचा अवमान समजला जातो. पण कर्नाटक व्याप्त भूभागाचा प्रश्न कोर्टात प्रलंबित असतानाही कर्नाटक सरकारने बेळगावचं नामांतर केलं.

बेळगावला उपराजधानीचा दर्जा दिला आणि विधिमंडळाचं अधिवेशनही घेतलं. कर्नाटकची ही मस्ती जिरवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता हा वादग्रस्त भागच केंद्रशासित करण्याची मागणी केली पाहिजे. कोर्टात ही मागणी करायला हवी, असं मुख्यमंत्री म्हणाले. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील महाराष्ट्र एकीकरण समिती फुटली कशी? मराठी माणलासा दुहीचा शाप आहे. एकीकरण समिती ही मराठी माणसाच्या एकीची ताकद होती. आपण आपल्या मायबोलीची ताकद उधळून लावली.

कशासाठी? तर राजकीय स्वार्थासाठी. या एकीकरण समितीत अपशकुन नको म्हणून आम्ही कधी त्यात शिवसेना आणली नाही. मार्मिकही आणलं नाही, असं सांगतानाच आता पुन्हा ही ताकद निर्माण करण्याची गरज आहे, असंही ते म्हणाले.

ही बातमी पण वाचा : केंद्र सरकारला देशात अराजकता आणायची आहे का? – आदित्य ठाकरे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER