मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून मयुर शेळकेचे कौतुक ;रेल्वे ट्रॅकवर पडलेल्या चिमुरड्याचा वाचवला जीव

Maharashtra Today

मुंबई : रेल्वे ट्रॅकवर पडलेल्या एका लहान मुलाचा जीव वाचविणारा देवदूत मयुर शेळके याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray)यांनी मयुर शेळकेला ( Mayur Shelke) फोन करुन त्याचे कौतुक केले आहे.

तुमचे कौतुक करायला माझ्याकडे शब्द नाहीत. कल्पनेच्या पलिकडचं काम केलंत तुम्ही. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तुम्ही त्या मुलाचा जीव वाचवलात. कल्पनेच्या पलिकडचे काम केलंत तुम्ही. आईचे खूप आशीर्वाद मिळाले असतील, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

वांगणी रेल्वे स्थानकावर सात वर्षांचा चिमुकला मुलगा अंध आईसोबत चालताना चुकून रेल्वे ट्रॅकवर पडला. इतक्यात समोरुन भरधाव वेगाने एक्स्प्रेस येत होती. आई जीवाच्या आकांताने आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आरडाओरड करत होती. तेव्हा रेल्वेचा पॉईंटमन मयुर शेळके देवदुतासारखा मायलेकाच्या मदतीला धावून आला.

आपल्या जीवाची पर्वा न करता त्याने अवघ्या सात सेकंदात चिमुकल्याचे प्राण वाचवले. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. खुद्द रेल्वेमंत्र्यांनीही मयूर शेळके यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button