मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाजपाचे धोरण चालवत आहे – संजय निरुपम

मुंबई :- सीएए, एनपीआर, एनआरसीच्या मुद्द्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यानंतर सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेसने मात्र यावर नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एनपीआर हा एनआरसीचा आधार कसा आहे हे समजून घेण्यासाठी नागरिकता दुरुस्ती नियम २००३ ची संक्षिप्त माहिती आवश्यक आहे. एकदा आपण एनपीआर केल्यास आपण एनआरसी थांबवू शकत नाही. भारतीय राज्यघटनेच्या रचनेनुसार सीएएची गरज पुन्हा समजून घेण्याची गरज आहे की धर्म हा नागरिकत्वाचा आधार होऊ शकत नाही. असा सल्ला त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिला आहे. आणि त्यांच्या या ट्विटला काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी रिट्विट करत समर्थन दिले आहे.

मनीष आपलं मत योग्य आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने सीएए, एनपीआर आणि एनआरसी विरोधी भूमिका घेतली आहे. पण कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळे मुख्यमंत्री म्हणून काम करणारे उद्धव ठाकरे सीएए एनपीआर आणि एनआरसी या विषयावर ना त्यांचा सल्ला घेत आहेत ना त्यांचे ऐकत आहेत.ते भाजपाचे धोरण चालवत आहे, असे ट्विट संजय निरुपम यांनी केले आहे.

एनपीआर केल्यास तुम्ही एनआरसी थांबवू शकत नाही; काँग्रेस नेत्याचा मुख्यमंत्र्यांना सल्ला


Web Title : CM uddhav thackeray is running bjp policy – sanjay nirupam

Maharashtra News : Latest Mumbai Marathi News only on Maharashtra Today