मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी थेट साधणार संवाद ; भूमिकेकडे सगळ्याचे लक्ष

CM Uddhav Thackeray.jpg

मुंबई : राज्यात एकीकडे कोरोनाचे संकट (Corona crises) असताना राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. हे लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे आज दुपारी 1 वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

राज्यात दररोज कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे . यापार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणांचे तीनतेरा वाजले असून सर्वसामान्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे .

त्यामुळे कोरोनाला आवर कसा घालायचा असा महत्त्वाचा प्रश्न सगळ्यांसमोर आहे. त्याहून पलीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधक ठाकरे सरकारवर निशाणही साधत आहेत . कोर्टाकडून मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर भाजपकडून वारंवार ठाकरे सरकारला टार्गेट केले जात आहे. त्यावर आज उद्धव ठाकरे काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER