मुख्यमंत्री आज उस्मानाबादच्या दौऱ्यावर, आज तरी शेतकऱ्यांचे अश्रू पुसणार का?

CM Uddhav Thackeray Meeting

उस्मानाबाद :- राज्यात परतीच्या पावसाने अक्षरश: थैमान घातलं आहे. या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला. अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (बुधवार, २१ ऑक्टोबर) उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देत शेतकऱ्यांसह ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधतील.

परतीच्या पावसाने महाराष्ट्रात हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. तसेच शेतीचंही मोठ्याप्रमाणात नुकसान झालं. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सोमवारी (१९ ऑक्टोबर) सोलापूरचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी सोलापुरात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना २५ हजार रुपये मदतीचे चेक दिले होते. मात्र ही तात्पुरत्या स्वरुपाची मदत न देता भरघोस मदत द्या, अशी मागणी बळीराजा करत आहे.

उद्धव ठाकरे सकाळी ९.३० वा. सोलापूर शासकीय विश्रामगृह येथून मोटारीने काटगावला (ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) जातील. अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची, शेती व पिकांच्या नुकसानीची पाहणी करून तुळजापूरमार्गे अपसिंगा-कात्री येथे जातील. दुपारी १२ वाजता अपसिंगा येथून तुळजापूर शासकीय विश्रामगृहाला जातील. दुपारी एक वाजता पूरपरिस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा व अभ्यागतांना भेटून पत्रकारांशी संवाद साधतील. दुपारी दोनच्या सुमारास शासकीय विश्रामगृह तुळजापूर येथून सोलापूरला येऊन तेथून विमानाने मुंबईला परत येतील.

ही बातमी पण वाचा : निकष बदला, शेतकऱ्यांना उडवाउडवीचे उत्तर देऊ नका; फडणवीसानी सरकारला ठणकावले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER