मुख्यमंत्री ठाकरे प्रथमच बारामतीत, पवारांच्या गोविंद बागेत खास प्रीतीभोजनाचं आयोजन

CM Uddhav Thackeray-sharad pawar

पुणे :- शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची इतिहासात पहिल्यांदाच आज (गुरुवारी) बारामतीत जाहीर सभा होत आहे. कृषिकच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बारामतीला येत आहे. सकाळी ९ वाजता कृषिक शेती प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. बॉलीवूड अभिनेता अमीर खान याची या कार्यक्रमास खास उपस्थिती असणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच बारामतीत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे या सभेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे

बारामतीतील शारदानगर येथील ११० एकर मधील कृषी विज्ञान केंद्र आयोजित कृषिक शेती प्रदर्शन आजपासून सुरू होत आहे. चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दादासाहेब भुसे कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार खासदार सुप्रीया सुळे व सिने अभिनेता अमीर खान हे या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, सभेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व इतर पाहुण्यांसाठी शरद पवारांच्या गोविंद बागेत खास प्रीतिभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे प्रथमच बारामतीत येत आहेत. जलयुक्त शिवार योजनेसोबत पाणी फौंडेशनच्या कामाचीही चर्चा जोरात असल्याने आमीरचीही हजेरी लक्षणीय ठरणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शरद पवारांना बारामतीत भेटणार