हिंमत असेल तर फिल्मसिटी यूपीत नेऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचे योगींना खुले आव्हान

yogi Adityanath & Uddhav Thackeray

मुंबई :- हिंमत असेल तर मुंबईतील फिल्मसिटी (mumbai film city) उत्तरप्रदेशात नेऊन दाखवावी, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (cm yogi adityanath) यांना खुलं आव्हान दिलं आहे.

देशातील सर्वांत मोठी फिल्मसिटी उत्तरप्रदेशात बनवणार, असं वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्यावर उद्धव ठाकरे यांनी योगी आदित्यानाथ यांच्यावर टीकेचा बाण सोडला आहे. मुंबईतील फिल्मसिटी हलवण्याच्या मुद्द्यावर शिवसेना आणि भाजपमध्ये वादंग पेटले आहे.

बॉलिवूड इंडस्ट्रीला सध्या अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे. या समस्या सोडवण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. दादासाहेब फाळके यांनी ज्या भूमीत चित्रपटसृष्टीचा मुहूर्तमेढ रोवली त्या ठिकाणी मी तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही, असे आश्वासनही यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER