शिवसेनेच्या ‘या’ नेत्याला कोरोनाची लागण; आमदारांची बैठक रद्द

CM Thackeray-Anil Parab

मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. राजकीय नेत्यांनाही कोरोनाने विळखा घातला आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांना लीलावती रुग्णालयात दाखल केले आहे. अनिल परब यांना कोरोनाची लक्षणे  असल्याने त्यांना लीलावतीत दाखल केल्याची माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सावध पवित्रा घेत मुंबईतील आमदारांची बैठक रद्द केली आहे.

परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह (Corona Report Positive) आला आहे. त्यांना घरीच क्वारंटाईन करण्यात आलं होतं. मात्र त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल केलंं आहे.  या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील आमदारांची बैठक रद्द केली आहे.

कोरोना, अनलॉकसह इतर राजकीय विषयांवर चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आज वर्षा निवासस्थानी आमदारांची बैठक बोलवली होती. यात मुंबईतील आमदार सहभागी होणार होते. मात्र अनिल परब यांना कोरोना झाल्याचे समजताच मुख्यमंत्र्यांनी सावध पवित्रा घेतला आहे. त्यांनी वर्षावर बोलवलेली आजची बैठक रद्द केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER