ई-पास रद्द होणार?, मुख्यमंत्र्यांनी उद्या बोलावली उच्चस्तरीय बैठक

Thackeray On E-pass

मुंबई : ‘अनलॉक ४’ साठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आले आहेत. त्यानंतर महाराष्ट्र सरकारकडूनही लवकरच गाईडलाईन्स जारी होणार आहेत. याअंतर्गत ई-पासबाबत उद्या (३१ ऑगस्ट) राज्य सरकारची महत्त्वाची बैठक होणार आहे. ई-पास सुरुच राहणार की हद्दपार होणार याबाबत उद्याच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे

राज्यभरात ई-पास संदर्भात संताप व्यक्त केला जात होता. कारण, अद्यापही खासगी वाहनांनी प्रवास करण्यासाठी ई-पास अनिवार्य आहे. त्यामुळे ई-पास रद्द करण्याची मागणी जनसामान्यांकडून केली जात होती. त्यासंदर्भात उद्या एक महत्त्वाची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली आहे. या बैठकीला राज्यातील सचिव आणि गृहमंत्री अनिल देशमुख उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यातील ई-पास रद्द होण्याची शक्यता बळावली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER