उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींना शुभेच्छा

CM Uddhav Thackeray-PM Modi.jpg

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज (१७ सप्टेंबर) ७० वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मोदींना शुभेच्छा दिल्या.

ही बातमी पण वाचा:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 70 वा वाढदिवस   

“आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुमची कायम निरोगी व तंदुरूस्त राहा हीच प्रार्थना. दीर्घायुष्यासाठी सदिच्छा”, अशा आशयाचे ट्विट करत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या.

दरम्यान खासदार आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरवरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी देखील मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER