कोरोनामुक्त गाव ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून तरूण सरपंचावर कौतुकाचा वर्षाव

cm-uddhav-thackeray-appreciate-sarpanch of corona-free-village

मुंबई : राज्यात कोरोनाच्या (Corona Virus) संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका आहे. पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी रविवारी राज्यातील जनतेशी संवाद साधला. राज्यातील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय (Lockdown Extend) यावेळी त्यांनी घेतला आहे. या संवादावेळी मुख्यमंत्री कोरोनामुक्त गावाची संकल्पना मांडत राज्यातील ३ सरपंचांचे कौतुक केले.

शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोरोना रुग्णसंख्या वाढतेय, प्रत्येक गावानं कोरोनामुक्त व्हायचं ठरवलं तर ही लाट थोपवू शकता. माझं कुटुंब माझी जबाबदारी, मी जबाबदार अशा मोहिमा राबवल्या त्याला चांगलं यश मिळालं. प्रत्येकानं ठरवलं मी माझं गाव कोरोनामुक्त करायचं तर नक्कीच करू शकतो.

सगळ्यांनी ठरवलं माझं घर कोरोनामुक्त, वस्ती कोरोनामुक्त, गाव कोरोनामुक्त, तालुका कोरोनामुक्त सगळं राज्य कोरोनामुक्त व्हायला वेळ लागणार नाही. हिवरेबाजारचे पोपटराव पवार, घाटणे गावचा सरपंच ऋतुराज देशमुख, कोमल करपे यांनी त्यांची गावं कोरोनामुक्त केली. या तरूण मुलांच्या कामाचे कौतुक आहे. मी लवकरच तिघांशी बोलणार आहे. मी जसं तुमच्याशी बोलतोय तसं या तिघांनाही तुमच्याशी बोलायला सांगणार आहे. कोरोनामुक्त गाव ही संकल्पना आपल्याला राबवायची आहे. महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतो. गाव कोरोनामुक्त झाल्यावर राज्य कोरोनामुक्त होईल, महाराष्ट्राचा आदर्श देशाने घेतला तर देश कोरोनामुक्त होईल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button