मोदींच्या भाषेत सांगायचं झालं तर महाराष्ट्र आत्मनिर्भरतेसाठी लोकांनी पुढे यावे – मुख्यमंत्री

CM Uddhav Thackeray

मुंबई : दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. आजपासून लॉकडाऊन 4 ची सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनच्या लढ्यात आता लोकांनी पुढे यायला हवे असे आवाहनही केले. मोदींच्या भाषेत सांगायचं झालं तर महाराष्ट्र आत्मनिर्भर करण्यासाठी आता ग्रीन झोनमधल्या लोकांनी पुढे यावं. इतके दिवस तुम्ही महाराष्ट्र वाचवण्यासाठी घरात राहिलात आणि करोनाशी लढा दिला. आता जे उद्योग सुरु होत आहेत त्यासाठी मनुष्यबळ कमी पडल्यास ग्रीन झोनमधल्या माणसांनी पुढे यावं असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. सोशल मीडियाच्या आधारे त्यांनी महाराष्ट्राशी संवाद साधला त्यामध्ये त्यांनी मोदींच्या भाषेत महाराष्ट्र आत्मनिर्मभर करायचा असेल तर ग्रीन झोन मधल्या लोकांनी पुढे यावं असं आवाहन केलं आहे.

करोनाचा प्रादुर्भाव नाही असा ग्रीन झोन आपल्याला करोना विरहित ठेवणं हे आपल्यापुढचं आव्हान आहे. घरात राहा आणि सुरक्षित राहा हे आपलं घोषवाक्य आहे. आता ग्रीनझोनमधल्या माणसांनी मनुष्यबळ कमी पडत असेल तर माझ्या महाराष्ट्रासाठी पुढे यावं असंही आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

“३१ मेपर्यंत देश आणि आपला महाराष्ट्रही लॉकडाउनमध्ये आहे. मी आलो की लॉकडाउनच जाहीर करतो असं तुम्हाला वाटत असेल. साहजिक आहे, किती काळ लॉकडाउनमध्ये काढणार ? याला काही उत्तर आहे का? जगात कुणाकडे करोनाचं उत्तर नाही. युद्ध नेहमी शस्त्राने लढलं जातं. मात्र इथे हातात शस्त्र नाही. अंतर ठेवणं आणि जिंकणं हे कठीण आहे. लॉकडाउन वाढवणं हे काही अंशी नक्कीच बरोबर आहे. महाराष्ट्रात आणि मुंबईत करोना रुग्णांची संख्या वाढते आहे. नाशिक, पुणे, औरंगाबाद या ठिकाणीही संख्या वाढते आहे. मग आत्तापर्यंत काय केलं? हा प्रश्न पडलाच असेल. आपण मार्चपासून काळजी घेतो आहोत त्यामुळे रुग्णसंख्या आटोक्यात ठेवू शकलो आहोत. आपण करोनाची श्रृंखला मोडू शकलेलो नाही. मात्र लॉकडाउनच्या गतिरोधकाने आपण करोनावर नियंत्रण ठेवू शकलो आहोत” असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

“येत्या काळात ग्रीन झोन, ऑरेंज झोनमध्ये शिथिलता आणली आहे. येत्या काळात आणखी शिथिलता देणार आहोत असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आजपर्यंत राज्यात ५० हजार उद्योगांना संमती दिली आहे. ५ लाख मजूर यामध्ये काम करत आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं. उद्योगांसाठी काही गोष्टी जाहीर करायच्या आहेत. कारण पॉज बटण दाबलं गेलं आहे. ज्यामुळे जग थांबलं आहे असंही ते म्हणाले आहेत. सरकारला ६ महिने होत आहेत. त्याआधीच या संकटाला सामोरं जावं लागतं आहे. एका हिंमतीने आपण पुढे जातो आहोत. नवीन उद्योग येण्यासाठी वेगळी स्पर्धा आहे. ४० हजार एकरपेक्षा जास्त जमीन नव्या उद्योगधंद्यांसाठी राखीव ठेवली आहे. नवे उद्योजक कदाचित जमीन खरेदी करणार नाहीत मात्र त्यांना भाडे तत्त्वावर जमिनी देऊ” असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

राज्यातील ग्रीन झोनमध्ये लवकरच पुन्हा उद्योग सुरु होतील. परंतु, परराज्यातील कामगार गावी परतल्याने याठिकाणी मनुष्यबळाचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. राज्यातील भूमिपूत्रांनी या संधीचा फायदा घ्यावा. महाराष्ट्र पुन्हा उभा करु, अशा निश्चयाने नोकरीसाठी घराबाहेर पडा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तरुणांना केले. दरम्यान, संकटाच्या काळात महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता उत्पन्न होऊ नये यासाठी मला विधपरिषदेवर बिनविरोध निवडून देण्यासाठी सर्वच पक्षांनी सकारात्मक भूमिका घेतली. त्यांचे मी आभार मानतो. सर्वानी मिळून कोरोनाला हरवायचे आहे असेही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला