मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळे जागतीक व्यासपीठावर ; अमेरिकेच्या परिसंवादाचे निमंत्रण

Supriya Sule-CM Thackeray

मुंबई :  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आता जगाच्या व्यासपीठावर दिसणार आहेत. अमेरिकेतील हार्वर्ड स्कुलच्या वतीने आयोजित परिसंवादात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना आमंत्रण देण्यात आले आहे. या वर्षी या परिसंवादाचे प्रक्षेपण जगभरात केले जाणार आहे.

“भारतातील विरोधी पक्षांची भूमिका ” या विषयावर हा परिसंवाद होणार आहे. हारवर्ड स्कुलचे ( Harvard School)सूरज येंगडे (Suraj Yengde )यांनी हा परिसंवाद आयोजित केला आहे.
“चीफ मिनिस्टरस राऊंड टेबल” या कार्यक्रमात “केंद्र आणि राज्य शासन यांच्यातील महत्वाच्या विषयांवर परस्पर संबंध आणि संमती” या विषयावर परिसंवाद होणार आहे. कोविड-19 मुळे त्या त्या राज्याच्या अर्थकारणावर झालेला बदल आणि त्यामुळे निर्माण झालेली आव्हाने या विषयावरही मुख्यमंत्री बोलणार आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या राऊंड टेबल परिसंवादात ठाकरे यांच्या सोबत झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेनही सहभागी होणार आहेत. हारवर्ड केनेडी स्कुल आणि हारवर्ड बिजनेस स्कुल च्या विद्यार्थ्यांनी या परिसंवादाचे आयोजन केले आहे.

भारतात 2014 नंतर भाजपने केंद्रात एकहाती सत्ता मिळवली आहे. असे असले तरी काही राज्यांमध्ये इतर पक्षांनी एकहाती सत्ता मिळवली आहे. उत्तरेकडील काही राज्यांमध्ये काँग्रेस, दिल्लीमध्ये आप आणि महाराष्ट्रात राष्ट्रवादीने सत्ता मिळवली होती. या राज्यांमध्ये हे कसे शक्य झाले या विषयावर ही चर्चा होणार आहे.

यावर्षी हे संम्मेलन ऑनलाईन आयोजित केले आहे. परिसंवादासाठी मोफत नाव नोंदणी केलेल्या आणि प्रीमियम तिकिटे घेतलेल्यांना या परिसंवादाचे थेट प्रक्षेपण पाहता येईल. 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता या परिसंवादाला सुरवात होणार आहे. राष्ट्र महाराष्ट्रने हे वृत्त दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER