‘उद्धवा, महाराष्ट्र तुझ्या खांद्यावर उभा आहे बेटा !’ सिंधूताई सपकाळ यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुक

CM Uddhav-Sidhutai

मुंबई :- कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार फेसबुकवरून संवाद साधत लोकांना संयम राखण्याचे आवाहन करत महत्त्वाचे निर्णय आणि सूचनांची माहिती देत आहेत. उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळत आहेत, त्याचे सर्वच स्तरांतून कौतुक केले जात आहे. आता सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ यांच्याकडूनही उद्धव ठाकरे यांना कौतुकाची थाप मिळाली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ यांच्यात फोनवरून चर्चा झाली. महाराष्ट्रात कोरोनाच्या संकटाशी उद्धव ठाकरे ज्या प्रकारे लढत आहेत ते पाहून सिंधूताई सपकाळ यांनी त्यांचे कौतुक केले. “उद्धवा, महाराष्ट्र तुझ्या खांद्यावर उभा आहे.  सगळी जबाबदारी तू उत्तमरीत्या पेलतो आहेस.” असे माई म्हणजेच सिंधूताई सपकाळ म्हणाल्या. या दोघांचीही संवादाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे . हा संवाद एखाद्या आई आणि मुलामधल्या संवादासारखाच होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्या प्रकारे कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत ते पाहून सिंधूताई सपकाळ यांनीही त्यांचे मनोधैर्य वाढवले.

सौजन्य : Online मराठी