बिहार निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय

Uddhav Thackeray & Aditya thackeray

मुंबई : आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने (Shivsena) ५० उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या प्रचारासाठी २० जणांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे प्रचाराची मुख्य धुरा हि पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे राहणार आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रत्यक्ष जाणार नसून ते आभासी सभांतून (व्हर्च्युअल रॅली) प्रचार करणार असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासह २० नेत्यांची यादी शिवसेनेने निवडणूक आयोगाला सादर केली आहे. मात्र, उद्धव व आदित्य ठाकरे प्रत्यक्ष प्रचाराला जाणार नसल्याचे राऊत यांनी दिलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे.

शिवसेनेने जाहीर केलेल्या यादीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, संजय राऊत, चंद्रकांत खैरे, अनिल देसाई, विनायक राऊत, अरविंद सावंत, गुलाबराव पाटील, राजकुमार बाफना, प्रियंका चतुर्वेदी, राहुल शेवाळे, कृपाल तुमाने, सुनिल चिटणीस, योगराज शर्मा, कुशलेंद्र शर्मा, विनय शुक्ला, गुलाबचंद दुबे, अखिलेश तिवारी, अशोक तिवारी, आदी नेत्यांचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER