… उद्धव ठाकरे आपडा’ ; 21 गुजराती उद्योगपतींचा रविवारी शिवसेनेत प्रवेश!

21 Gujarati Industrialists Joins Shiv Sena

मुंबई : मुंबईत मराठी मतदारांसोबतच गुजराती मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी शिवसेनेने एका मेळाव्याच्या माध्यमातून गुजराती मतदारांना साद गातली होती. त्या मेळाव्याची ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ ही टॅगलाईनही चांगलीच गाजली होती. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आपडा या वाक्यावरून तर विरोधकांनी जोरदार राजकारणही केले होते. मात्र, आता खरोखर गुजरांती बांधवांनी उद्धव ठाकरे आपडा असे सिद्ध करण्याच्या तयारीत आहेत असे दिसून येते. यावरूनच शिवसेनेच्या त्या जिलेबी ना फाफडा उद्धव ठाकरे आपडा याला यश मिळाल्याचे समजत आहे.

शिवसेनेच्या या ‘जिलेबी-फाफडा डिप्लोमसी’चं फलित म्हणून येत्या रविवारी 7 फेब्रुवारी रोजी 21 गुजराती उद्योगपती शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. गुजराती उद्योगपतींच्या शिवसेना (Shiv Sena) प्रवेशाने शिवसेनेला आर्थिक बळ तर मिळणार आहेच शिवाय ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या व्होटबँकेला सुरुंग लावण्यातही शिवसेनेला यश मिळणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

जिलेबी फाफडा आणि वडापावच्या बेतानंतर आता शिवसेनेने गुजराती बांधवांसाठी येत्या 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता मालाडच्या सिल्व्हर ओक रेस्टॉरंटच्यावर लँडमार्क हॉलमध्ये आणखी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमात गुजराती बांधवांसाठी रासगरबाचं आयोजन करण्यात आलं आहे. तसेच याचवेळी 21 गुजराती उद्योजक आणि व्यावसायिकांना शिवसेनेत प्रवेश देण्यात येणार आहे. शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शहा यांना कार्यक्रम आयोजित केला आहे.

दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीला आता एक वर्षाचा अवधी उरलांय. त्यामुळे शिवसेनेनं आता भाजपची व्होटबँक असलेल्या गुजरातीबहूल विभागात मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन सुरू केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER