मुख्यमंत्री आज रात्री संवाद साधणार ; राज्यात लॉकडाऊन की कठोर निर्बंध?

CM Uddhav Thackeray

मुंबई : गेल्या महिन्यापासून राज्यात कोरोनाचे (Corona) संकट वाढतच चालले आहे. मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यांत तर कोरोना रुग्णसंख्येचा स्फोट झाला आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन (Lockdown) लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आज रात्री ८.३० वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत.

त्यामुळे राज्यात लॉकडाऊन होणार की कठोर निर्बंध लागू होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  अनेक भागात लॉकडाऊन करण्यात आला आहे. काही ठिकाणी कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तरीही अनेक ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे. हे पाहता राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button