पंचगंगा प्रदूषण : मुख्यमंत्री घेणार बैठक; प्राधिकरण स्थापण्याची खासदार, आमदारांची मागणी

CM to hold meeting on Panchganga pollution

मुंबई : पंचगंगा प्रदूषणप्रश्नी लवकरच बैठक घेतली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना खासदार, आमदार यांच्या शिष्टमंडाळाला दिली. वर्षा निवासस्थानी झालेल्या भेटीत खा. धैर्यशील माने यांनी प्रदूषण नियंत्रणासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याची मागणी केली.

जिल्ह्याची जीवनदायी असलेली पंचगंगा नदी उद्योगधंद्यांमधून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यामुळे प्रदूषित झाली आहे. इचलकरंजीसह हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील अनेक गावांत प्रदूषणाचा प्रादुर्भाव आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांची काल, शनिवारी भेट घेण्यात आली.

यावेळी पंचगंगा प्रदूषण नियंत्रणासाठी भरीव निधीचीही मागणी करण्यात आली. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व जिल्ह्याचे पाटील-यड्रावकर, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, खासदार प्रा. संजय मंडलिक, आमदार प्रकाश पाटील, चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील, डॉ सुजित आदी संपर्कमंत्री उदय सामंत, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी मिणचेकर, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार उल्हास उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER