लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत माझा समावेश हे ‘मला साथ देणाऱ्या प्रत्येकाचे यश आहे’ – मुख्यमंत्री

CM Uddhav Thcakeray

मुंबई :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील जनता, मंत्रिमंडळातील सहकारी आणि सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

त्यांच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. तमाम चाहत्यांचे मुख्यमंत्री ठाकरेंनी आभार मानताना हे माझे एकट्याचे यश नाही तर, मला साथ देणाऱ्या प्रत्येकाचे यश आहे अशा शब्दांत आभार मानले आहेत.

ही बातमी पण वाचा : चक्रीवादळापासून मुंबईसह महाराष्ट्राचे रक्षण करणाऱ्या सगळ्यांचे आभार – मुख्यमंत्री 

”लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत माझा समावेश झाला, हे माझे एकट्याचे यश नाही. सहा महिन्यांच्या काळात शिवरायांचे हे राज्य पुढे नेण्यासाठी मला साथ देणाऱ्या प्रत्येकाचे यश आहे.

मुख्यमंत्रीपद हे निमित्त आहे. महाराष्ट्राची सेवा घडत आहे हे महत्वाचे. लोकप्रियतेत माझा वरचा नंबर येण्यापेक्षा महाराष्ट्र जगभरात पहिल्या क्रमांकाचे राज्य कसे करता येईल हेच माझे ध्येय आहे.

महाराष्ट्राच्या जनतेने संकट काळात विश्वास दाखवला, माझे मंत्रिमंडळातील सहकारी, सर्व अधिकारी या सर्वांचे आभार!

अर्थात तमाम शिवसैनिकांचे प्रेम व शिवसेनाप्रमुख आणि माँसाहेबांचा आशीर्वाद या शिवाय ही झेप शक्य नाही”. अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तमाम नागरिकांचे आभार मानले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER