मुख्यमंत्र्यांनी मानले केंद्र सरकारचे आभार!

CM Uddhav Thackeray - PM Narendra Modi - Maharashtra Today

मुंबई : राजकीय घडामोडींमुळे केंद्र आणि राज्य सरकारमधील संबंध ताणले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. देशातील ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोना लस देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रासोबत बैठक घेतली. या बैठकीत केंद्राने ४५ वर्षांवरील व्यक्तींना १ एप्रिलपासून लसीकरणाला सुरुवात होईल, असा निर्णय जाहीर केला. याबद्दल मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारचे (Central Government) आभार मानले.

मुख्यमंत्र्यांच्या मागणीला यश
कोविडचा (COVID-19) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक आहे. यासाठी वयोगटाची अट शिथिल करणे गरजेचे आहे. विशेषतः ४५ वर्षांवरील व्यक्ती कामासाठी बाहेर असतो, त्यांना प्रतिबंधात्मक लस मिळणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्र्यांनी व्हिसीमध्ये सांगितले. ही मागणी मान्य झाल्याने लसीकरणाला आणखी गती मिळणार आहे.

महाराष्ट्रात ४५ लाख लोकांना लसीकरण
सुरुवातीच्या टप्प्यातही लसीकरणात महाराष्ट्र अव्वल होते. राज्यात आतापर्यंत २२ मार्चच्या आकडेवारीनुसार ४५ लाख ९१ हजार ४०१ जणांचे लसीकरण झाले आहे.

जावडेकरांकडून लसीकरणाबाबत घोषणा
येत्या १ एप्रिलपासून ४५ वर्षांहून अधिक वयोगटांना कोरोनाची लस (Coronavirus Vaccination) मिळणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनी यासंदर्भात घोषणा केली. ४५ वर्षांवरील प्रत्येकाने लसीकरणासाठी नोंदणी करावी, असे आवाहन जावडेकरांनी केले. आतापर्यंत सहव्याधी असलेल्या ४५ वर्षांवरील व्यक्तींनाच कोरोना लस दिली जात होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER