पंढरपुरात कोरोनासंदर्भात आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची बैठक

CM Uddhav Thackeray

पंढरपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंढरपूर येथे पोहचल्यानंतर कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता संजीव ठाकूर आदी उपस्थित होते.

ही बातमी पण वाचा:- बा.. विठ्ठला महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाकडे साकडे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER