मुख्यमंत्री आजच निर्णय घेऊन नियमावली तयार करणार : अस्लम शेख

Aslam Sheikh-CM Uddhav Thackeray

मुंबई : “महाराष्ट्रात उद्या लॉकडाऊनची (Lockdown) घोषणा होण्याची शक्यता आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आजच निर्णय घेतील. इतकेच नव्हे तर लॉकडाऊनबाबत नियमावली आजच तयार होईल.” अशी माहिती माध्यमांशी बोलताना राज्याचे मंत्री अस्लम शेख (Aslam Sheikh) यांनी दिली.

“गेल्या आठवड्यापासून आपण मीटिंग घेऊन सगळे विरोधी पक्षाच्या लोकांना विश्वासात घेत आहोत. टास्क फोर्सशी चर्चा झाली. लोकांचीही मते जाणून घेत आहोत. ‘ब्रेक द चेन’ यानुसार आज निर्णय होईल. लॉकडाऊन करणे गरजेचे आहे. मुंबई शहरामध्ये किंवा या राज्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त टेस्ट केले आहेत. त्यामुळे केस जास्त आहेत.

साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन करावे लागणार आहे. याबाबत नियमावली आजच जाहीर होणार आहे. परप्रांतियांना घरी जाण्यासाठी अडवत नाही.” असे अस्लम शेख यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button