मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवारांशी चर्चा करेल ; कोयत्याला न्याय मिळेल : पंकजा मुंडे

Sharad Pawar-Pankaja Munde-uddhav-thackery

मुंबई : एकीकडे राज्यात कोरोनाचे संकट (Corona Crises) दिवसेंदीवस वाढतच चालले आहे . तर दुसरीकडे ऊसतोड कामगारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे . ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर भाजपच्या नेत्या आणि माजी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी भावनिक साद घातली आहे. याप्रकरणी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वास मुंडे यांनी दिले आहे . पंकजा मुंडे  (Pankaja Munde) यांनी ट्वीट करून सर्व ऊसतोड कामगार आणि मजुरांना धीर ठेवण्याचे आवाहन केले आहे.

‘माझ्या ऊसतोड मजूर बांधवांच्या न्याय मागण्यांसाठी सन्माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, कारखानदारांचे प्रतिनिधी ना.जयंत पाटील, साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्याशी चर्चा करणार आहे.’ असं पंकजांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

‘आपण सर्वांनी विश्वास ठेवावा, आपल्या कोयत्याला सन्मान नक्कीच मिळेल तथापि, कोयत्याची धार आणि सन्मान सांभाळण्याची जबाबदारी ऊसतोड कामगार आणि मुकादमांवर देत आहे’ असं आवाहनही पंकजांनी कामगारांना केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER