उद्धव ठाकरे मिस्टर सत्यवादी, संजय राठोडांबाबत योग्य तो निर्णय घेतील: संजय राऊत

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे न्यायप्रिय नेते आहेत. ते मिस्टर सत्यवादी आहेत. त्यामुळे पूजा चव्हाण प्रकरणात (Pooja Chavan Case) ते संपूर्ण सत्य जाणून घेऊन योग्य तो निर्णय घेतील, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले.ते शनिवारी मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

लोकशाहीत विरोधकांना आंदोलन करण्याचा हक्क आहे. मात्र, कोरोनाच्या काळात प्रत्येकाने लोकशाहीच्या मर्यादा पाळल्या पाहिजेत, असेही संजय राऊत यांनी सांगितले. यावेळी त्यांनी संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या राजीनाम्याशिवाय अर्थसंकल्पीय अधिवेशन होऊच देणार नाही, या विरोधकांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले. विरोधकांना विरोध करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, अधिवेशन होऊनच द्यायचं नाही, ही आडमुठी भूमिका लोकशाहीच्या विरोधात असल्याचे संजय राऊत म्हणाले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER