‘या’ निर्णयाबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार

CM Uddhav Thackeray-PM Modi

मुंबई : कोरोनाचा (Corona virus) वाढता संसर्ग पाहता सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Modi) यांचे आभार मानले आहे .

सीबीएसई बोर्डाची बारावीची परीक्षा अखेर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक बोलवली होती. त्यात त्यांनी हा निर्णय घेतला होता. त्यावर आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सीबीएसई बोर्डाची बारावीची परीक्षा अखेर रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विट करत देण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी जनतेला संबोधित करताना बारावी आणि दहावी तसेच इतर महत्वाच्या परीक्षा रद्द करण्यात याव्या, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button