चक्रीवादळापासून मुंबईसह महाराष्ट्राचे रक्षण करणाऱ्या सगळ्यांचे आभार – मुख्यमंत्री

CM Thackeray-Nature Cyclone

मुंबई: निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यातून मुंबईसह महाराष्ट्राचे रक्षण करणाऱ्या सगळ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार मानले आहेत. निसर्ग चक्रीवादळ पश्चिम किनारपट्टीवर धडकणार असल्याचे कळल्यानंतर महाराष्ट्र प्रशासनाने या वादळापसून वाचण्यासाठी आधीच खबरदारी घेतली होती. ठिकठिकाणी रेस्क्यू टिम तैनात होती. अखेर हे वादळ काल अलिबाग कडून येत मुंबईला भेदून गेले. या वादळापासून मुंबईसह महाराष्ट्राचे रक्षण करणाऱ्या सगळ्यांचे मुख्यमंत्री ठाकरेंनी आभार मानले आहेत.

ही बातमी पण वाचा:- देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सर्वेक्षणात झाले उघड

काय म्हणाले मुख्यमंत्री –

महाराष्ट्रावर कोरोना चे संकट घोंघावत असतानाच चक्रीवादळाचा तडाखा बसला. संकट म्हटले तर मोठे होते, पण हे संकट आपण सगळ्यांनी परतवून लावले आहे. जनता व प्रशासनाने झूंज दिली व संकटाची तीव्रता कमी केली. दुर्दैवाने दोन जीव अपघातात गेले.

कोकणात तसेच इतरत्र नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. मुंबा देवीचीच कृपा मुंबईवर आहे तशी पंढरपूरच्या विठू माऊली चा आशीर्वाद आहेत. मुख्य म्हणजे या वादळाला थोपवून सामना करणारे महापालिका अधिकारी, जिल्हा प्रशासन, आपत्कालीन व्यवस्थापन, वैद्यकीय पथके या सगळ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. वृत्तवाहिन्या सुद्धा लोकांना चांगली माहिती देत होत्या.

निसर्गापुढे कोणाचेही चालत नाही. पण पंकट काळात महाराष्ट्र एक आहे.खंबीर आहे हे या वादळात दिसुन आले.

हीच आपली एकजूट महाराष्ट्राला सर्व संकटातुन बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही.

जय महाराष्ट्र!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER