माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत मुख्यमंत्री ठाकरेंचे यशस्वी पाऊल

CM Uddhav Thackeray

मुंबई: कोरोनाने (Corona virus) राज्याच्या प्रत्येक शहरात, खेड्यात हातपाय पसरले आहेत. कोरोनावरची लस कधी येणार हेदेखील अद्याप निश्चित नाही. आमि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केवळ टाळेबंदी लावून उपयोग नाही हे लक्षात आल्यानंतर आता राज्य सरकारने कोरोनावर मात करण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ (My family is my responsibility) ही मोहिम राबवली आहे.

या मोहिमेत ५५ हजार २६८ पथकं स्थापन करण्यात आली आहेत. तर आत्तापर्यंत ६९.९४ लाख घरांना भेट देऊन झाली असून आत्तापर्यंत २ कोटी २४ लाख व्यक्तींची तपासणी झाली आहे. ३७ हजार ७३३ कोविड संशयित व्यक्तींची तपासणीही झाली आहे. त्यापैकी ४ हजार ५१७ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या आहेत अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी ट्विट करुन दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER