मुख्यमंत्र्यांचा साधेपणा ; राजेशाही खुर्चीवर बसायला दिला नकार

CM Uddhav Thackeray Video

औरंगाबाद :- उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी खांद्यावर घेतल्यानंतर सर्वांत  जास्त चर्चा झाली ती त्यांच्या साधेपणाची. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना ‘कुटुंबप्रमुख’ जसे ओळखले जाते, तसाच त्यांचा साधेपणाही नेहमी चर्चेचा विषय असतो. आज औरंगाबादमध्ये (Aurangabad) पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांचा साधेपणा पाहण्यास मिळाला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद शहराच्या दौऱ्यावर आहेत. आज दुपारी त्यांच्या हस्ते औरंगाबाद शहर पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन पार पडले. उद्धव ठाकरे जेव्हा व्यासपीठावर पोहचले होते तेव्हा त्यांच्यासाठी राजेशाही खुर्ची ठेवण्यात आली होती. इतर मान्यवरांसाठी साधी खुर्ची ठेवलेली होती.

मुख्यमंत्री राजेशाही खुर्चीजवळ पोहचले असता समोरील प्रकार पाहून त्यांनी तातडीने राजेशाही खुर्ची बाजूला हटवण्याची सूचना दिली. सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने व्यासपीठावरून राजेशाही खुर्ची हटवली आणि त्या जागी साधी खुर्ची ठेवली. त्यानंतरच मुख्यमंत्री ठाकरे हे साध्या खुर्चीवर बसले. मुख्यमंत्र्यांचा हा साधेपणा पाहून शिवसेनेचे नेते, मंत्री आणि पालिकेचे कर्मचारी भारावून गेले होते.

‘कोरोना काळात बसून केलेल्या कामाच्या शुभारंभाची सुरुवात झाली आहे.अनेक वर्षांपासून पाणी पुरवठा योजना रखडली होती. नुसता लेझीम खेळ सुरू होता. माझ्या कवाडीमुळे लोकांच्या घरात पाणी जात असेल तर माझं भाग्य आहे. काम न करता मला लाडका मुख्यमंत्री व्हायचं  नाही. काम करून मला लाडकं व्हायचं  आहे’ असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता टोला लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER