बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक एकनाथ शिंदे; उद्धव ठाकरेंनी त्यांच्याकडून काही तरी शिकावे : नितेश राणे

Uddhav Thackeray-Eknath Shinde-Nitesh Rane

मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे (Tauktae Cyclone) कोकणात प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे कोकण दौऱ्यावर गेले होते .यावरून भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर ताशेरे ओढले आहे . तौक्ते चक्रीवादळानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले, असे वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केले. उद्धव ठाकरे हे कोकणात जाण्यासाठी घराबाहेर पडले. मात्र, कपड्याची इस्त्रीही मोडू न देता ते मुंबईत परतले.

याउलट एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कोकणवासीयांना मदत तरी पाठवली. त्यासाठी मी एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो. बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक कसा असतो, हे त्यांनी दाखवून दिले. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याकडून काही तरी शिकावे, हा माझा मैत्रीपूर्ण सल्ला असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले. उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावर बोलताना राणे यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली .मुख्यमंत्री वायरीत गेले नाहीत, निवतीत गेले नाहीत. ज्या भागात सर्वांत  जास्त नुकसान झाले त्या वैभववाडी, देवगडकडे ढुंकूनही पाहिले नाही.

त्यामुळे मुळात याला दौरा म्हणू शकता का ? देवेंद्रजी कोकणात फिरताहेत, मी घरी बसून राहिलो तर उद्या मला उत्तरं द्यावी लागतील म्हणून उद्धव ठाकरेंनी हा दौरा केला का? असा प्रश्नही नितेश यांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरे केवळ चिवला बीचवर जाऊन माघारी फिरले. चिवला बीचवर ते राणे साहेबांचं घर पाहायला आले होते का? कदाचित त्यांचं आमच्यावरील प्रेम आजही कमी झालेले नाही. कारण या ठिकाणी ते खूप दिवस राहिले आहेत, आमच्याबरोबर जेवले आहेत. त्यामुळे त्यांना बघायचे असेल की, राणेंच्या घराला तर काही नुकसान झाले नाही ना, असा टोला नितेश यांनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button