मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात आढावा बैठक सुरू

CM Thackeray Review meeting with Sharad Pawar

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आढावा बैठक सुरू झाली आहे. बैठकीला मंत्री जयंत पाटील, खासदार संजय राऊत, मुख्य सचिव अजोय मेहता उपस्थित आहेत. राज्यात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ३० मेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली.

मात्र राज्यातील जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी काही अटी शिथिल कराव्याच लागतील, अशी स्पष्ट भूमिका शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी मांडल्याने सूत्रे हलली आणि त्यानुसार काही अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता राज्यातील निर्बंध कायम ठेवण्यात येतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाजमाध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधताना सोमवारी रात्री स्पष्ट केले होते. टाळेबंदीत वाढ करताना रेड झोन वगळता अन्यत्र राज्यातील जनजीवन पूर्वपदावर येईल अशा पद्धतीने नियोजन करावे, अशी सूचना शरद पवार यांनी गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत केली होती.

ही बातमी पण वाचा:- यावेळी मात्र संजय राऊतांनी राज्यपालांना घातला साष्टांग दंडवत

परंतु, ठाकरे यांनी सावध भूमिका घेतल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये नाराजीचा सूर होता. यावर मंगळवारी सकाळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक बोलाविली होती. शरद पवार यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी या वेळी उपस्थित होते. राज्यात आर्थिक संकट उभे राहू नये म्हणून टाळेबंदीच्या काही अटी शिथिल करून राज्यातील परिस्थिती पूर्वपदावर आणावी लागेल. यासाठी दररोज काही ठरावीक वेळ निश्चित करावा, अशी सूचना शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत केली होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER